मुंबई: टी-20 मालिका गमावल्यानंतर न्यूझीलंडने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघाने एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते तर पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तिसर्या वनडेतही टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर होती पण पावसामुळे ती पुढे ढकलली गेली. भारताला केवळ 219 धावा करता आल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 18 षटकात 104 धावा केल्या होत्या. त्यानंतर क्राइस्टचर्चमध्ये पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल येऊ शकला नाही कारण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सामना थांबण्यापूर्वी किमान 20 षटके आवश्यक असतात.
न्यूझीलंडकडून उत्तम कामगिरी
पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलनने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 54 चेंडूत 57 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने नाबाद 38 धावा केल्या. भारताकडून उमरान मलिकला एकमेव विकेट मिळाली. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने ३ बळी घेतले. त्याचवेळी अॅडम मिलनेनेही तीन बळी घेतले. टीम साऊदीने दोन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन आणि सँटनरने 1-1 विकेट घेतली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द घोषित करण्यात आला आहे. क्राइस्टचर्चमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह यजमान संघ न्यूझीलंडने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-0 ने जिंकली आहे.
भारताने सलग दुसरी वनडे मालिका गमावली
भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सलग दुसरी वनडे मालिका गमावली आहे. 2020 मध्येही टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकली होती, मात्र एकदिवसीय मालिकेत 0-3 ने पराभव पत्करावा लागला होता. यावेळीही भारताने टी-20 मालिका जिंकली आणि एकदिवसीय मालिकेत पराभव स्वीकारला.
क्राइस्टचर्चमध्ये भारताची फलंदाजी फ्लॉप ठरली. केवळ वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यरने विकेटवर टिकून राहण्याची तसदी घेतली. सुंदरने 51 आणि श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार धवन 28, शुभमन गिल 13, ऋषभ पंत केवळ 10 धावा करू शकले. सूर्यकुमार यादव केवळ 6 धावा करून बाद झाला. दीपक हुडाने 12 धावांची खेळी केली.
- हेही वाचा:
- पावसामुळे खेळ थांबला; न्यूझीलंडने 18 षटकांत 1 गडी गमावत केल्या 104 धावा
- गौतम गंभीर ‘या’ खेळाडूला भावी कर्णधार म्हणून पाहतोय; सांगितले याचे मोठे कारण