मुंबई: भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ नेपियर येथे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भिडत आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू झाली आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. वेलिंग्टन येथे होणारा मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. नेपियरमध्ये पावसामुळे टॉसला उशीर झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्षल पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
मैदानावर असलेल्या डी कॉनवे आणि फिलिप्स या जोडीने उत्तम खेळी करत न्यूझीलंडचा स्कोर चांगल्या स्थितीत आणला. यावेळी डी कॉनवे हा चांगली खेळी करत असलेला दिसून येत आहे. यावेळी कॉनवे आणि फिलिप्स यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. या दोघांची ही जोडी मजबूत स्थितीत खेळी करत असतानाच सिराजने फिलिप्सची विकेट घेत ही भागीदारी तोडली. न्यूझीलंडच्या 16 षटकात 3 गडी गमावून 135 धावा झाल्या आहेत.
फिन ऍलन आणि डेव्हन कॉनवे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले होती. भारताच्या गोलंदाजीची सुरुवात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी केली. त्यांनतर आलेल्या युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सलामीवीर फिन ऍलनला बाद करून किवी संघाला सुरुवातीचा धक्का दिला आहे. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अॅलनला अर्शदीपने एलबीडब्ल्यू आऊट केले. अॅलन 4 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर चैपमैन हा फलंदाजीसाठी आला होता मात्र तोही काही खास खेळी करू शकला नाही. तो अवघ्या 12 धावाच काढू शकला आणि सिराज च्या गोलंदाजीवर अर्शदीपच्या हाती चेंडू देत झेलबाद झाला.
- हेही वाचा:
- IND VS NZ T20 Series: अर्शदीपच्या गोलंदाजीने केली कमाल; न्यूझीलंडला दिला पहिला झटका
- न्यूझीलंडचा दुसरा खेळाडूही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला; पहा सविस्तर वृत्त