मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात किवी संघाने 17 चेंडू राखून सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम. संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 104 चेंडूत 145 धावांची सर्वोच्च नाबाद शतकी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 19 चौकार आणि पाच षटकार निघाले.
ऑकलंडमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित षटकांत सात गडी गमावून 306 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाने 47.1 षटकांत तीन गडी गमावून सहज गाठले. टॉम लॅथमशिवाय कर्णधार केन विल्यमसनने 98 चेंडूत नाबाद 94 धावांचे योगदान दिले. या विजयासह न्यूझीलंडने सध्या सुरू असलेल्या मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडकडून अप्रतिम फलंदाजी
न्यूझीलंडची अप्रतिम फलंदाजीही टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरली. टॉम लॅथमने शानदार शतक झळकावले. या डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या 76 चेंडूत शतक ठोकले. लॅथमने कर्णधार विल्यमसनसोबत 200 हून अधिक धावांची भागीदारी करून भारताला सामन्यातून बाहेर काढले.
- हेही वाचा:
- शिखर धवन-शुभमन गिलची पहिल्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त सुरुवात; पहा सविस्तर वृत्त
- शिखर धवन आणि श्रेयस अय्यरच्या धडाकेबाज खेळीने भारताचे न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य; पहा सविस्तर वृत्त