मुंबई: लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली आहे. टीम इंडियाला पहिल्या तीन षटकांतच दोन झटके बसले. रोहित शर्माच्या जागी सलामीला आलेला विराट कोहली स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला, तर शिखर धवननेही निराशा केली. 6 चेंडूत 5 धावा करून कोहली बाद झाला, तर धवनने 8 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
विराट आणि धवन लवकरच बाद झाल्यांनतर त्यांनतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदर ही आज म्हणावी तशी खेळी करू शकला नाही. तोही अवघ्या 11 धावा करून हसन च्या गोलंदाजीवर कर्णधार लिटन दासच्या हाती झेल देत झेलबाद झाला. आज या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडू बांग्लादेशी गोलंदाजासमोर गुडघे टेकताना दिसून आले. सध्या मैदानावर श्रेयस अय्यरसोबत केएल राहुल फलंदाजीसाठी आला असून, या दोघांकडून चांगल्या खेळीची भारताला आवश्यकता आहे. भारताच्या यावेळी 14 षटकात 3 गडी गमावत 53 धावा झाल्या आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेहदी महान मिराजचे नाबाद शतक आणि महमुदुल्लाहच्या 77 धावांच्या जोरावर बांगलादेशने 50 षटकांत 7 बाद 271 धावा केल्या.
- हेही वाचा:
- मेहदी हसनच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर बांग्लादेशने भारताला दिले 272 धावांचे लक्ष्य
- भारताला सुरुवातिलाच मिळाले दोन मोठे झटके; विराट कोहलीपाठोपाठ शिखर धवनही पॅव्हेलियनमध्ये परतला