मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली गेलेली 3 सामन्यांची टी-20 मालिका 1-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाने आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्याची तयारी सुरू केली आहे. पहिला सामना 25 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे, तर संघाची कमान शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे. धवनच्या नेतृत्वाखालीच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली होती. त्याला आता कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे.
सामन्यापूर्वी टीम इंडियाने नेटवर भरपूर घाम गाळल्याचे दिसून आले. यावेळी प्रशिक्षक लक्ष्मण यांनीही संघावर लक्ष ठेवून होते आणि त्यांनी संघाला यावेळी टिप्सही दिल्या. टीम इंडियाने नेटवर भरपूर सराव करताना कर्णधार शिखर धवननेही दमदार फलंदाजी केली. वेगवान गोलंदाज उमरान मलिकला वनडे मालिकेत संधी मिळू शकते अशी आशाआहे. संजू सॅमसनला टी-20 मालिकेत संधी मिळाली नव्हती मात्र त्याला वनडेत संधी मिळेल, अशी चाहत्यांना आशा आहे. पंत किंवा संजू यापैकी कोणाला पुढील सामन्यात संधी मिळेल हे अजून निश्चित नसले तरी संघ व्यवस्थापनाला पुन्हा कोणालातरी ड्रॉप करावे लागेल.
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबरला डन पार्क, ऑकलैंड येथे होणार आहे. याआधी भारतीय संघातील सर्व खेळाडू परिश्रम घेताना दिसून आली. टी 20 मालिका आपल्या नावावर केल्यानंतर आता शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय सामन्यातही अशीच कामगिरी दाखवत मालिका आपल्या नावावर करेल अशी आशा आहे.
- हेही वाचा:
- सूर्यकुमार यादवसाठी टी 20 तील ‘हा’ विश्वविक्रम मोडणे कठीण; जाणून घ्या कोणता आहे हा विश्वविक्रम
- IND VS NZ T20 Series: अर्शदीपच्या गोलंदाजीने केली कमाल; न्यूझीलंडला दिला पहिला झटका