मुंबई: लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली आहे. टीम इंडियाला पहिल्या तीन षटकांतच दोन झटके बसले. रोहित शर्माच्या जागी सलामीला आलेला विराट कोहली स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला, तर शिखर धवननेही निराशा केली. 6 चेंडूत 5 धावा करून कोहली बाद झाला, तर धवनने 8 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या यजमानांनी मेहदी हसन मिराजचे नाबाद शतक आणि महमुदुल्लाहच्या 77 धावांच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 271 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने तीन तर उमरान मलिक आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारतीय संघ आज पुन्हा एकदा फलंदाजीत खरब कामगिरी करताना दिसून आली. एका मागोमाग एक विकेट गमावत भारताने पुन्हा एकदा आपल्या खराब खेळीचे प्रदर्शन चालूच ठेवले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या केएल राहुलला दुसऱ्या वनडेत विशेष काही करता आले नाही. मेहदी हसन मिराजने राहुलला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला चौथा धक्का दिला. 28 चेंडूत 14 धावा करून राहुल बाद झाला. भारताने 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर राहुलची विकेट गमावली. सध्या श्रेयस अय्यरला साथ देण्यासाठी अक्षर पटेल मैदानात उतरला असून आता या दोघांना विकेट न गमावता सावध खेळी करावी लागणार आहे. भारताच्या यावेळी 21 षटकात 4 गडी गमावून 94 धावा झालेल्या आहेत.
- हेही वाचा:
- टीम इंडिया दडपणाखाली; शकिबने भारताला दिला तिसरा धक्का, वॉशिंग्टन खेळू शकला नाही ‘सुंदर’ इनिंग
- भारताला सुरुवातिलाच मिळाले दोन मोठे झटके; विराट कोहलीपाठोपाठ शिखर धवनही पॅव्हेलियनमध्ये परतला