मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारतीय संघ 47.3 षटकांत 219 धावांवर गडगडला. टीम इंडियासाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने 51 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने 49 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून अॅडम मिलने आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी तीन तर टीम साऊथीने दोन गडी बाद केले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू झाली आहे.
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि त्यानंतर अॅलन यांनी किवी संघाला सावध सुरुवात करून दिली आहे. यजमानांनी पहिल्या 10 षटकांत कोणतेही नुकसान न करता 59 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांना किवी संघाच्या विकेट लवकरात लवकर काढाव्या लागतील. कॉनवे आणि अॅलन ज्या पद्धतीने खेळत आहेत, त्यामुळे भारतीय संघाला मालिका गमावण्याचा धोका आहे. अॅलन 37 आणि कॉनवे 25 धावा करून क्रीजवर आहे.
पॉवरप्लेमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची जादू चालू शकली नाही. दोन्ही गोलंदाजांना अजूनही विकेट मिळवता आले नाहीत.
न्यूझीलंडने डावाच्या 10व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. डावाच्या 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेने दीपक चहरला चौकार ठोकून किवी संघाची धावसंख्या 50 पर्यंत नेली. वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या या षटकाच्या चार चेंडूंमध्ये कॉनवेने सलग चार चौकार मारले. किवी संघाने 10 षटकात कोणतेही नुकसान न करता 59 धावा केल्या. न्यूझीलंडच्या 11 षटकात 71 धावा झालेल्या आहेत.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडची फलंदाजी सुरू, फिन ऍलन-डेव्हन कॉनवे ही जोडी उतरली क्रीझवर
- तिसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर ठेवले 220 धावांचे लक्ष्य; वॉशिंगटन सुंदरने खेळली अर्धशतकी खेळी