पंढरपूर ते सांगोला रस्त्यावर जुनोनीजवळ वारकऱ्यांना वाहनाने धडक दिली. या धडकेत सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी इथले आहेत. ते कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघाले होते.
‘विठूमाऊली’च्या मंदिरासाठी ६१ कोटी ५० लाखांचा आराखडा; पहा नेमके कसे रुपडे बदलणार परिसराचे
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जठारवाडी गावाला भेट तात्काळ भेट देत अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मंगळवारी जठारवाडी येथून मृत वारकऱ्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ज्या वारकऱ्यांना चार दिवसांपूर्वी विठूरायाच्या दर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या त्यापैकी मृत वारकऱ्यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ गावकऱ्यांवर आली.
या अपघातात, शारदा आनंदा घोडके (वय ६१), सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार (वय १४), सर्जेराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यापैकी सांगोला तालुक्यातील गावडे रुग्णालय येथे १ आणि ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे २, पंढरपूर येथे २ जणांवर उपचार सुरु आहेत.
दरवर्षी कोल्हापुरातील जठारवाडी येथून वारकरी कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला पायी दिंडीत सहभागी होतात. यंदाही दिवाळी झाल्यानंतर वारकऱ्यांची पायी दिंडी सुरू झाली. हरिनामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले होते, मात्र सांगोल्यानजीक या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला.