क्रेडिट कार्ड ही आजच्या जनरेशनसाठी सहजतेने वापरायची गोष्ट आहे. आजची जनरेशन खूप निवांत आणि बिंधास्त आहे. मात्र या जनरेशनला एक वाईट सवयही आहे. त म्हणजे कुठलीही गोष्ट वरवर बघण्याची… तुमच्यापैकी कितीतरी लोक क्रेडिट कार्ड वापरत असतील, मात्र अनेकांना माहिती नसेल की, क्रेडिट कार्ड वापरताना काही शुल्क लावले जातात.
या कार्डशी संबंधित काही शुल्क आहेत जे खूप जास्त आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणार्यांना या शुल्कांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
१) जेव्हा विनामूल्य क्रेडिट कार्ड दिले जाते तेव्हा जॉइनिंग फी आणि वार्षिक शुल्क माफ केले जाते. मात्र, ही सूट केवळ ठारवीत कालावधीसाठी देण्यात आलेली असते.
२) मासिक क्रेडिट कार्ड बिलामध्ये एकूण देय रक्कम आणि किमान देय रक्कम नमूद असते. उर्वरित रक्कम नंतर दिली जाऊ शकते असे गृहीत धरून लोक बर्याच वेळा कमीत कमी देय रक्कम देण्याचा पर्याय निवडतात. पण हे तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवेल. बँका सहसा थकीत रकमेवर मासिक ३ ते ४ टक्के दराने व्याज आकारतात. परंतु क्रेडिट कार्डासाठी व्याज खूपच जास्त म्हणजे वार्षिक ३६ टक्के ते ४८ टक्के असते.
३) जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर देय रक्कम भरली नाही तर बँक अतिरिक्त शुल्क आकारते. याला ‘लेट पेमेंट चार्ज’ म्हणतात. देय तारखेनंतर पैस भरल्यास दिल्यास ‘लेट पेमेंट चार्ज’ भरावा लागतो.
४) जेव्हा एखादा ग्राहक त्यांच्या क्रेडिट कार्डवर निश्चित केलेल्या मासिक क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतो तेव्हा ओव्हरड्राफ्ट शुल्क त्याला द्यावे लागते.
- ट्रेनची तिकिटे आणि पेट्रोल खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरल्यास जादा शुल्क आकारले जाते.
६) ग्राहकांना एटीएममधून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा देखील आहे. मात्र, अशा व्यवहारासाठी शुल्क द्यावे लागते. हे शुल्क आपण काढलेल्या रकमेच्या २.५ टक्के आहे.
७) ग्राहकांना एटीएममधून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा देखील आहे. मात्र, अशा व्यवहारासाठी शुल्क द्यावे लागते. हे शुल्क आपण काढलेल्या रकमेच्या २.५ टक्के आहे.
संपादन : स्वप्नील पवार