मुंबई: बांग्लादेशचा कर्णधार लिटन दासने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील हा सामना शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फ्लॉप ठरले. त्याचवेळी, केएल राहुलने विकेट पडण्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण खेळी केली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने शानदार गोलंदाजी केली. त्याने भारताच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
बांगलादेश संघाला अफिफ हुसैनच्या रूपाने सातवा धक्का बसला आहे. संघासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हुसेन १२ चेंडूत सहा धावा करून कुलदीप सेनचा बळी ठरला आहे. हुसेनचा झेल मोहम्मद सिराजने टिपला. कुलदीप सेनला लागलीच त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे यश मिळाले आहे. यावेळी त्याने खालच्या फळीतील फलंदाज इबादत हुसेनला आपला बळी बनवले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात खाते न उघडता तो बाद झाला.
- हेही वाचा:
- रहीम आणि महमुदुल्लाहच्या खेळीने बांग्लादेशचा डाव मजबूत स्थितीत, टीम इंडियाची मात्र वाढली अडचण
- भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारतीय संघ 7 वर्षे जुना हिशोब चुकता करण्यासाठी उतरेल, जाणून घ्या याविषयी सविस्तर वृत्त