आयपीओ : डीसीएक्स सिस्टम्स या कंपनीचे शेअर ११ नोव्हेंबर रोजी ‘बीएसई’ आणि ‘एनएसई‘मध्ये लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स बीएसईवर 289.10 रुपये प्रति शेअर या दराने सूचिबद्ध झाले, शुक्रवारी बाजारात आलेल्या मजबूत रॅलीमुळे या कंपनीच्या आयपीओच्या किमतीपेक्षा 39.66% अधिक प्रीमियम लिस्ट झाली. डीसीएक्स सिस्टम्स ही एक वायर कंपनी आहे.
या कंपनीच्या आयपीओचा प्राइस बॅंड 197-207 रुपये प्रति शेअर केले गेले. त्याचवेळी शुक्रवारी सकाळी 10.40 मिनिटांवर या कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास 45% वाढून 305 रुपत्यांवर गेली. गुंतवणूकीसाठी हे इश्यू ३१ ऑक्टोबर ते २ नवंबर पर्यंत खुले होते.
- मनी ट्रान्सफर : या देशामध्ये करता येणार त्वरित पैसे हस्तांतरित, ‘यूपीआय’ आणि ‘पेनाऊ’ची लिंक सेवा होणार लवकरच सुरु
- सेबी : जाणून घ्या ‘सेबी’ने मांडलेल्या या प्रस्तावाबद्दल
- क्लोसिंग बेल : ‘हे’ शेअर्स आज सर्वाधिक वाढले तर सेन्सेक्स वाढला 1181 अंकांनी
- मूडीज : म्हणून मूडीजने केली भारताच्या जीडीपी अंदाजात कपात
डीसीएक्स सिस्टम्सच्या आईपीओमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, बुधवारी शेवटच्या दिवशी कंपनीचे आयपीओ स्बस्किप्शन सुमारे 69.79 वेळा सबस्क्राइब झाले.आयपीओमध्ये 1.45 कोटी समभागांच्या तुलनेत 101.27 कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाली. डीसीएक्स सिस्टम्स आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदार कोटा 84.32 वेळा सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 61.77 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 43.97 पट सदस्यता घेण्यात आला. भारतामध्ये संरक्षण आणि एरोस्पेसच्या संधी वाढल्या आहेत, अशा परिस्थितीत डीसीएक्स सिस्टम्समध्ये विशेष नोकरी उपलब्ध होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.