पुणे :
सध्या ईडी आणि एनसीबीनी बेधडक कारवाई करण्याचा जोरदार तडाखा सुरूच ठेवला आहे. आता एका आमदारच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. आमदार हितेंद्र ठाकुर यांचा पुतण्या मेहूल ठाकूरला ईडीने अटक केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुलला अटक करण्यात आले असल्याचे समजत आहे.
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नातेवाईकांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्या होत्या. या ईडीच्या कारवाईमुळे हितेंद्र ठाकुर यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहूल ठाकूरसह मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, ईडीची जी काही चौकशी असेल त्याला आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत. त्यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या तपासात जे काही निष्पन्न होईल त्याबाबत आम्ही आमचा व्यवहार दाखवायला तयार आहोत. कारण सर्व व्यवहार धनादेशाने झाले आहेत. माझ्या कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने आता मीही मोठा झालो आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com