मुंबई: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने रवींद्र जडेजा आणि यश दयाल यांच्या जागी अष्टपैलू शाहबाज अहमद आणि वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचा संघात समावेश केला आहे. दयाल यांची पाठदुखीची तक्रार अजूनही कायम आहे. त्याच वेळी, स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झालेला नाही आणि तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २५ नोव्हेंबरपासून ऑकलंड येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सुरुवातीला कुलदीप सेन आणि शाहबाज अहमद यांना संघात स्थान देण्यात आले होते. मात्र आता हे दोन्ही खेळाडू बांगलादेशला जाणाऱ्या संघाचा भाग असतील. न्यूझीलंड दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी गेलेल्या भारतीय संघात या दोन खेळाडूंच्या जागी अन्य कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सैमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर और उमरान मलिक.
भारत विरुद्ध बांगलादेश वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि कुलदीप सेन.
एवढेच नाही तर भारतीय निवड समितीने बांगलादेश अ विरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघाची देखील निवड केली आहे, ती पुढीलप्रमाणे-
पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ: अभिमन्यू ईश्वरन (क), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि अतित सेठ.
दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ: अभिमन्यू ईश्वरन (क), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सर्फराज खान, सरफराज खान, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित शेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि केएस भरत (यष्टीरक्षक).
- हेही वाचा:
- सिराज आणि अर्शदीपच्या गोलंदाजीने केली कमाल; न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले 161 धावांचे लक्ष्य
- Jio वापरकर्त्यांना मोठा धक्का; आता Disney+ Hotstar मोफत बघता येणार नाही, जाणून घ्या यामागचे कारण