मुंबई: निर्णायक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघ फलंदाजी करत आहे. हा सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळला जात आहे. पावसामुळे नाणेफेक नियोजित वेळेपासून 15 मिनिटे उशिराने सुरू झाली. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यावरही पावसाची सावली आहे.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि शुभमन गिल आले होते. भारताला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी धवन आणि गिल यांच्यावर होती मात्र युवा सलामीवीर शुभमन गिलच्या रूपाने भारताने पहिली विकेट गमावली आहे. अॅडम मिल्नेने गिलला मिचेल सँटनरकरवी झेलबाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यांनतर धवनही आज म्हणावी तशी चमक दाखवू शकला नाही तोही अवघ्या 28 धावा काढून शिखर धवनही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. डावाच्या 13व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धवन वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने त्रिफळाचीत केला. धवन 45 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. भारताने 15 षटकात 2 गडी गमावून 63 धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर श्रेयस अय्यर आणि त्याच्या जोडीला ऋषभ पंत सावध स्थितीत खेळी करत आहेत.
भारताला एकदिवसीय मालिकेत बरोबरी साधायची असेल तर आजचा सामना जिंकणे आवश्यक असून भारताला चांगली खेळी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढील खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारणे आवश्यक आहे.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामन्याचे नाणेफेक जिंकले; भारत करणार प्रथम फलंदाजी
- भारताला मिळाला पहिला धक्का; शुभमन गिल अवघ्या १३ धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला