मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेहदी महान मिराजचे नाबाद शतक आणि महमुदुल्लाहच्या 77 धावांच्या जोरावर बांगलादेशने 50 षटकांत 7 बाद 271 धावा केल्या.
शार्दुल ठाकूरला बाद करून बांगलादेशने भारताला मोठा धक्का दिला. शार्दुल 7 धावा करून बाद झाला. आता संपूर्ण जबाबदारी रोहित शर्मा आणि दीपक चहर यांच्यावर असतानाच चाहर ही अवघ्या 11 धावा करून होसैनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. क्षेत्ररक्षणादरम्यान रोहितला दुखापत झाल्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले होते. यामुळे तो शिखर धवनसोबत सलामीला उतरला नाही. आता कोणत्याही परिस्थितीत भारताला हा सामना जिंकावयाचा असेल तर मैदानात उतरलेल्या रोहितला पुढील उरलेल्या षटकात ताबडतोब फलंदाजीचा नमुना दाखवावा लागणार आहे. परंतु त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो चांगली खेळी करू शकेल का हा मोठा पेच आहे. भारताच्या 46 षटकात 8 गडी गमावत 231 धावा झाल्या आहेत. यावेळी मैदानावर रोहित 20 धावा करून खेळत आहे तर त्याला सिराज साथ देत असून तो 1 धावावर खेळत आहे.
यजमान गोलंदाजांनी श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांना बाद करत सामन्यात जोरदार पुनरागमन केले. श्रेयस अय्यरचे तिसरे शतक १८ धावांनी हुकले तर अक्षरने अर्धशतक झळकावले. मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
- हेही वाचा:
- मेहदी हसनच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर बांग्लादेशने भारताला दिले 272 धावांचे लक्ष्य
- श्रेयस-अक्षरची एक्झिट टर्निंग पॉइंट ठरणार का? सामन्यात परतला रोमांच, जाणून घ्या सविस्तर या वृत्तातून