मुंबई: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना आज म्हणजेच बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहे. टीम इंडियासाठी या सामन्यातील विजय कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. हा सामना जिंकून भारत मालिका बरोबरीत आणू शकतो. त्याचबरोबर यजमान टीम इंडिया मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. भारताने प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली असून निम्म्याच्यावर भारताचा संघ मैदानाबाहेर परतला आहे.
आज भारताची फलंदाजी खूपच सुमार झाली असून भारताने आपले 6 गडी गमावले आहेत. भारताला दीपक हुडा च्या रुपात 6 व झटका मिळाला आहे. या सामन्यात तोही चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. तो अवघ्या 12 धावा करून साउदीच्या गोलंदाजीवर विकेटकीपर लाथमच्या हाती झेल देत झेलबाद झाला. यांनतर चाहर फलंदाजी करण्यासाठी आला असून तो वाशिंग्टनला साथ देताना दिसला. मात्र तोही मिचेलच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात साउदीच्या हाती झेल देऊन बसला. सध्या मैदानावर सुंदर वाशिंग्टन आणि चहल खेळी करत असून वाशिंग्टन चांगली सावध खेळी करतो आहे. भारताचा डाव सध्या नाजूक स्थितीत आलेला दिसतो आहे. यावेळी भारताने 40 षटकात 7 गडी गमावत 180 धावा केल्या आहेत.
- हेही वाचा:
- भारताला मिळाला सहावा झटका; दीपक हुडा स्वस्तात मैदानाबाहेर परतला
- भारत विरुध्द न्यूझीलंडच्या तिसऱ्या निर्णायक एकदिवसीय सामन्याआधी पावसामुळे नाणेफेकीला होतोय उशीर; जाणून घ्या कसे आहे तेथील हवामान