मुंबई: न्यूझीलंड क्रिकेट संघाला भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन नेपियरमध्ये खेळल्या जाणार्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बाहेर पडला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना मंगळवारी (22 नोव्हेंबर) नेपियर येथील मॅक्लीन पार्क येथे खेळवला जाईल. यजमान किवी संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी कर्णधाराचे बाहेर पडणे त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. पूर्व नियोजित वैद्यकीय भेटीमुळे केन विल्यमसन नेपियर टी20 मध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी फलंदाज मार्क चॅपमन न्यूझीलंड संघात सामील होणार आहे. या सामन्यात टीम साऊदी कर्णधार असेल.
BLACKCAPS captain Kane Williamson will miss the third T20I in Napier on Tuesday to attend a pre-arranged medical appointment. @aucklandcricket Aces batsman Mark Chapman will join the T20 squad in Napier today. #NZvIND https://t.co/kktn9lghhy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 21, 2022
विल्यमसन बुधवारी वनडे संघात सामील होणार आहे
अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीने माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात हॅटट्रिक घेतली. केन विल्यमसन बुधवारी एकदिवसीय संघात सामील होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) ईडन पार्कवर खेळवला जाईल.
विल्यमसनने दुसऱ्या टी-20मध्ये 61 धावांची खेळी केली
मालिकेतील पहिला T20 पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या T20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला होता. तिसरी टी-20 जिंकून टीम इंडियाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. दुसऱ्या टी-२०मध्ये भारताकडून सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले, तर दीपक हुडाने चार विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने सर्वाधिक ६१ धावा केल्या.
- हेही वाचा:
- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना होणार नेपियरमध्ये; जाणून घ्या सामना कुठे आणि केव्हा पाहायचा ते
- भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का; फिन ऍलन स्वस्तात मैदानाबाहेर परतला