मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकतो. वृत्तानुसार, 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये 6 देशांची स्पर्धा आयोजित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष आणि महिला दोन्ही संघांच्या स्पर्धेसाठी ही शिफारस केली आहे.
2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसी जोरदार प्रयत्न करत आहे. ब्रिटीश प्रकाशन टेलिग्राफच्या वृत्तानुसार, आयसीसीने पुरुष आणि महिलांच्या 6 संघांमधील या स्पर्धेचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे. T20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत टॉप 6 संघांना त्यांच्या क्रमवारीच्या आधारे स्थान दिले जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, 2028 ऑलिंपिक दरम्यान पुरुष आणि महिलांच्या 6 देशांच्या टी-20 स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्याऐवजी एकामागून एक आयोजित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनावर होणारा खर्च कमी करता येईल. खेळाडूंची संख्या कमी ठेवण्यासाठी, प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 14 खेळाडू घेऊन जाण्याची परवानगी असेल.
ऑलिम्पिकमधील 6 संघांदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या स्वरूपाविषयी बोलायचे झाल्यास, संघांना 3-3 अशा दोन गटात ठेवता येईल. यातून दोन्ही गटातील अव्वल 2 संघांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. बाद फेरीत विजयी होणारे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचतील. विजेत्या संघाला सुवर्णपदक, तर उपविजेत्या संघाला रौप्य पदक दिले जाईल. त्याचवेळी उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करणार्या दोन्ही संघांमध्ये कांस्यपदकासाठी सामना रंगणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता
क्रिकेट हा ऑलिम्पिकचा एक भाग आहे. 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. त्यात फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटनचे दोनच संघ सहभागी झाले होते. ग्रेट ब्रिटनने येथे सुवर्णपदक जिंकले तर फ्रान्सला रौप्यपदक मिळाले होते.
- हेही वाचा:
- द्रविडला शास्त्रींनी फटकारले; त्यावर ‘या’ स्टार खेळाडूने दिले उत्तर, पहा काय म्हणाला हा खेळाडू
- भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्यांची आकडेवारी आहे मनोरंजक; जाणून घ्या सविस्तर या वृत्तातून